Posts

Showing posts from July, 2022

chinhaki dnyaneshwar to gangadhar patil

 सुहृदगाथेचा लोप श्रीधर तिळवे नाईक  गंगाधर पाटील गेले एक सुहृदगाथा गेली मराठीतील संरचनावाद , विरचनावाद आणि उत्तरसंरचनावादाचा पाया घालणारा समीक्षक गेला  १९८९ साली मुंबई विद्यापीठात जेव्हा पी एच डी करायला आलो तेव्हा त्यांना मी प्रथम भेटलो त्यांच्या समीक्षेविषयी मी अतीव आदर व्यक्त केला मी कवी असूनही समकालीन तत्वज्ञानात रस घेतो हे त्यांना आवडले असावे त्यांच्या विद्ववतेचा दबदबा आहे असं मला कळलं तरी मी माझ्या बिनधास्त शैलीत त्यांना भेटत राहिलो  माझ्या मते मराठीत कादंबरीत भालचंद्र नेमाडे व समीक्षेत गंगाधर पाटील असे दोन दिग्गज साठोत्तरी पिढीत झाले  युरोपमध्ये जिला न्यू क्रिटीसिझ्म म्हणतात तिचा उदय झाल्यावर मराठीत तिचा प्रभाव पडणे अटळ होते दोन्ही धोंडगे व गंगाधर पाटील ह्या तीघांनी ही चळवळ व्यापक प्रमाणावर आणली व पुढे मिलिंद मालशे ,  म सु पाटील , राजीव नाईक , हरिश्चन्द्र थोरात ह्यांनी त्याचा विस्तार केला माझ्या पी एच डी साठी संरचनावाद व उत्तरसंरचनावाद मला फार महत्वाचा वाटत असल्याने मी सरांच्यावर माझ्या चिन्हकीत केंद्रीय स्थान देऊन लिखाण केले होते माझा प्रयत्न सरांच्यापुढं जाऊन काय करता येईल ते प